Pankaj Tripathi's Daughter : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांचे लक्ष वेधले. ते त्यांच्या करिअरच्या यशाच्या शिखरावर आहेत असं आपण म्हणू शकतो. खरंतर पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख ही 'मिर्जापुर 3' मधील त्यांच्या कालीन भैया या भूमिकेमुळे मिळाली. त्यांच्या या भूमिकेनं सगळ्यांची मने जिंकली. मात्र, आता त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांची लेक आशीला घेऊन सगळीकडे चर्चा सुरु आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय प्रकरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच एका कार्यक्रमात पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या कुटुंबासोबत हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी देखील त्यांच्यासोबत होत्या. सुरुवातीला पापाराझी पंकज यांचा आणि करिश्माचा फोटो काढताना दिसतात. इतक्यात करिश्माचं लक्ष हे पंकज यांची पत्नी आणि लेक आशीकडे जातं ती त्या दोघांना नमस्कार करते आणि आशीला तिच्या शेजारी येऊन पोज देण्यास सांगते. सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे आशीला पाहून नेटकरी तिची स्तुती करत आहेत. त्यासोबत पंकज त्रिपाठी यांचे लेक असून तिनं एगदी साधा लूक कॅरी केल्यानं सगळ्यांना तिचं कौतूक वाटतं आहे. वडिलांप्रमाणेच तिचा देखील अगदी साधा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधताना दिसतोय. 


दरम्यान, पंकज त्रिपाठी यांच्या लेकीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, पंकज त्रिपाठी तुमची लेक खूप सुंदर आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, श्रद्धाचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, ती खरंच खूप सुंदर आहे. त्याशिवाय नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये इमोजींचा वर्षाव केला आहे. 


या आधी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत पंकज त्रिपाठी हे त्यांच्या लेकीला स्कुटी कशी चालवतात हे शिकवताना दिसत आहेत. फोटो पाहून त्यातही तिचा साधेपणा पाहून सगळे तिच्या साधेपणाचे चाहते झाले आहेत. आशी ही 18 वर्षांची आहे. ती लाइमलाइटपासून फार दूर राहते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही तृप्ती डिमरीची भुरळ? धनुषसोबत करणार रोमान्स, आनंद एल राय म्हणाले...


पंकज त्रिपाठी यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 'ओएमजी 2', 'स्त्री 2', 'स्त्री', 'मैं अटल हूं' आणि 'मर्डर मुबारक' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय मिर्झापुर या वेब सीरिजमुळे त्यांना खास लोकप्रियता मिळाली. त्या सीरिजमध्ये त्यांनी कालीन भैया ही भूमिका साकारली होती. पंकज त्रिपाठी लवकरच 'मेट्रो...इन दिनों' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेखसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.