दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही तृप्ती डिमरीची भुरळ? धनुषसोबत करणार रोमान्स, आनंद एल राय म्हणाले...

Tripti Dimri in South Movie : बॉलिवूडनंतर आता तृप्ती डिमरी दिसणार दाक्षिणात्य चित्रपटात? 

दिक्षा पाटील | Updated: Sep 22, 2024, 12:06 PM IST
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही तृप्ती डिमरीची भुरळ? धनुषसोबत करणार रोमान्स, आनंद एल राय म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Tripti Dimri in South Movie: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीनं अ‍ॅनिमल या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलेलं नाही. तिला एकामागेएक असे चित्रपट मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता राजकुमार रावसोबत 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीयो'मध्ये ती दिसणार आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये स्वत: ची छाप सोडल्यानंतर तृप्ती आता दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सगळ्या चर्चांवर 'तेरे इश्क में' या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक आनंद एल राय यांनी नुकतीच 'झूम'ला मुलाखत दिली होती. 'पीपिंगमून'च्या रिपोर्टनुसार, असं म्हटलं जात आहे की या चित्रपटात तृप्ती डिमरीला कास्ट करण्याविषयी विचारण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देत सांगितलं या सगळ्या चर्चा तशाच सुरु राहू द्या. मी लवकरच चित्रपटाच्या कास्टिंगविषयी सांगेन.' 

'तेरे इश्क में' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाची घोषणा गेल्यावर्षी झाली होती. धनुष हा त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्यामुळए चित्रपटाला उशिर झाला. आता या चित्रपटाच्या शूटिंगविषयी बोलायचे झाले तर ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे धनुषच्या या चित्रपटाचं कनेक्शन हे त्याचा 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रांझणा' शी असणार आहे. त्याचा हाच चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. तर आनंद एर राय यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि त्या चित्रपटात सोनम कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तिच्याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर 36 कोटी या चित्रपटाचं बजेट होतं. तर या चित्रपटाच्या त्यापुढे जात 94 कोटींचं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलं होतं. 

दरम्यान, तृप्ति डिमरीच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ' शिवाय कार्तिक आर्यनसोबत ती 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. विद्या बालन आणि माधुरी दीक्षित देखील या चित्रपटात दिसणार आहे. इतकंच नाही तर ती 'धडक 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.