Aditya Roy Kapur Kiss By Fan: अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सध्या त्याच्या 'द नाईट मॅनेजर' (The Night Manager) या वेब सीरिजच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. शोभिता धुलिपाला आणि अनिल कपूरही या चित्रपटामध्ये आदित्यबरोबर दिसणार आहेत. सध्या मात्र आदित्य एका भलत्याच व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्यला एका चाहतीने दिलेली वागणूक सध्या चर्चेत आहे.


दोनदा किस करण्याचा प्रयत्न...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यापैकी एका व्हिडीओने अगदी पापाराझींचंही लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य रॉय कपूरची एक महिला चाहती त्याला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. आदित्यने या महिलेबरोबर फोटो काढण्यास संमती दर्शवल्यानंतर ती त्याच्या जवळ गेली आणि तिने आदित्यला किस करण्याचा प्रयत्न केला. या महिलेला आदित्यने फोटोसाठी होकार दिल्यानंतर इतर काही चाहतेही आदित्यभोवती गोळा झाले. फोटो काढून झाल्यानंतर या महिलेने आदित्यच्या गालावर किस करण्याच प्रयत्न केला. मात्र आदित्यने वेळीच या महिलेला दूर ढकललं. मात्र तिने पुन्हा त्याला किस करण्याचा प्रयत्न केला.


अखेर किस केलं...


आदित्यने संताप आणि चिडचिड न करता या महिलेला पुन्हा दूर लोटलं आणि तो निघून जाऊ लागला. मात्र या महिलेने आदित्यला किस करण्याचा हट्ट कायम ठेवला अखेर आदित्यच्या हातावर किस करुनच ती शांत झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा आदित्यचा छळ आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. "अरे देवा! अशाप्रकारचा छळ योग्य नाही. लोकांना काय झालं आहे? मला तो आवडत असला तरी मी बळजबरीने त्याला किस करणार नाही. हा छळच आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर अन्य एकाने "ओ काकू कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही," अशी आठवण या महिलेला कमेंटमधून करुन दिली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by @varindertchawla


सीरिजबद्दल आदित्य म्हणाला...


आपल्या 'द नाईट मॅनेजर' या वेब सिरीजबद्दल बोलताना आदित्यने, "जेव्हा खुन्नस आणि विश्वासघात दोघांचीही जुगलबंदी पहायला मिळते तेव्हा तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा अटळ असतो. द नाईट मॅनेजरमध्ये याच कथेमध्ये काही कॉम्पलेक्स भूमिक पहायला मिळणार आहेत," असं सांगितलं. या वेब सिरीजमध्ये आदित्यने शान ही भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना आदित्यने, "शानच्या डोक्यात कधी काय सुरु असेल याचा अंदाज बांधता येणार नाही असं हे कॅरेक्टर असून कथानकही फारच रंजक आहे," असं म्हटलं.