रानू मंडलचा `मेकओव्हर`; सोशल मीडियावर चर्चा
रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल एका रात्रीत स्टार
मुंबई : काही महिन्यापू्र्वी गायक, अभिनेता हिमेश रेशमिया (Himesh Reshmia) यांनी सोशल मीडियातून लोकप्रिय झालेल्या रानू मंडल (Ranu Mondal) ला 'तेरी मेरी कहानी' (Teri Meri Kahani) या गाण्यातून सिनेजगतात लाँच केलं. आणि एका रात्रीत कानपूरला रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी रानू मंडल लोकप्रिय झाली. त्यानंतर रानू मंडलशी संबंधित सगळ्याच गोष्टी चर्चेत येऊ लागल्या. नुकताच रानू मंडलचा मेकओव्हर (makeover) झाला असल्याचं समोर आलं आहे.
कानपूरमध्येच राहणाऱ्या संध्या यांच्या 'संध्या मेकओव्हर सलून'चं (Sandhya's makeover Salon) उद्घाटन गायिका रानू मंडल यांच्याशी झालं आहे. 2013 पासून ब्युटिशिअन क्षेत्रात असलेल्या संध्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. 2018 मध्ये नवी दिल्लीत पहिलं मेकअप स्टुडिओ सुरू करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी आपलं तिसरं मेकओव्हर सलून कानपूरमध्ये सुरू केलं. याचं उद्घाटन तिने सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रानू मंडलच्या हस्ते करून घेतलं.
ध्याने रानू मंडल यांच्या हस्ते फक्त उद्घाटनच करून घेतलं नाही तर त्यांचा मेकओव्हर देखील केला आहे. यावर रानू मंडलने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणते की,'मी विश्वासच ठेवू शकत नाही की, ही मी आहे. संध्याने माझा खूपच चांगला मेकओव्हर केलाय. यामुळे मी खूप सुंदर दिसत असून माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी संध्याची खूप आभारी आहे. '
रानू मंडलच्या या मेकओव्हरची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काही नेटीझन्सनी रानू मंडलच्या या मेकओव्हरचं कौतुक केलंय, तर काहींनी टीका केली आहे. रानू मंडलने या कार्यक्रमात सोनेरी रंगाचा लेहंगा घातला असून मेकअप केला आहे. यावर नेटीझन्स रानू मंडलला ट्रोल करत आहेत.
ज्या नेटीझन्सनी रानू मंडलला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणलं. तेच नेटीझन्स रानू मंडलची खिल्ली उडवत आहेत. रानू मंडलचा लोकप्रिय झाल्यानंतर ऍटिट्यूड बदलला असल्याचं देखील नुकत्याच दोन व्हिडिओ पाहण्यात आलं.