Kacha Badam : कच्चा बदाम फेम अंजली अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती लाइमलाइटमध्ये राहते. कधी ती कोणत्या बिग बॉसच्या स्पर्धकावर कमेंट करताना दिसते. तर कधी तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसते. आता अंजलीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. मात्र, हा तिचा डान्स व्हिडीओ नाही. तर तिनं नवं घर घेतल्याचा आहे. अंजलीनं तिच्या मुंबईच्या घरात संपूर्ण कुटुंबासोबत प्रवेश केला आहे. पाहा अंजलीच्या घराती एक झलक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अंजली तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत गृह प्रवेशाची पूजा करताना दिसली. घराची पूजा तिचे आई-वडील करत असल्याचे या व्हिडीओ पाहायला मिळते. तर त्यांच्यासोबत काही नातेवाईक देखील आहेत. तर इतकी मोठी गोष्टी असली तरी अंजलीनं मात्र, खूप साधारण ड्रेस परिधान केला आहे. तिनं कॉटनचा ड्रेस परिधान केला आहे. नो मेकअप आणि मोकळे केस असा काही अंजलीचा लूक आहे. मात्र, सगळ्यांचं लक्ष हे तिच्या आलिशान घरानं वेधलं आहे. तर त्यावर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'नवीन घराच्या शुभेच्छा.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की 'इतक्या कमी वयात घर घेणं सोपी गोष्ट नाही. खूप खूप शुभेच्छा.' तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'इतके पैसे कुठून आले.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही काय काम करते ज्यातून इतके पैसे मिळतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कच्चा बदाम पक्क गया.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'यांच्याकडे इतके पैसे येतात कुठून.' 


हेही वाचा : अभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा


दरम्यान, अंजली अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अंजली नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. इतकंच नाही तर अंजलीचा जेव्हा एमएमएस लीक झाला होता. तेव्हा ती चांगलीच चर्चेत आली होती. या शिवाय ती कच्चा बादाम या गाण्याला लोकप्रियता मिळाल्यानंतर कंगना रणौतच्या लॉक अप या शोमध्ये दिसली होती. त्या शोमध्ये ती मुन्नवर फारुकीसोबत असलेल्या नात्यावरून चर्चेत आली होती.