`आजी-वडीलांच्या नावावर मतं मागितली नाहीत`... केआरके कडून राहुल गांधींचे कौतुक
केआरके या नावाने प्रसिद्ध असलेले कमाल सध्या काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. केआरके या नावाने प्रसिद्ध असलेले कमाल सध्या काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपले परखड मत मांडताना दिसत आहे. अशात कमान सुद्धा मागे राहिले नाहीत. त्यांनी राहुल गांधी आणि राजीव गांधी यांचा एक फोटो स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. मतांसाठी सगळेच पक्ष नवनवीन युक्त्या लढवताना दिसत आहे. कमान यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, राहुल यांनी कधीही मतांसाठी वडील आणि आजीच्या नावाचा वापर केला नाही असे म्हंटले आहे.
केआरके यांनी फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'राहुल गांधींचे फार कौतुक करतो. ३८ गोळ्या घालून त्यांच्या आजीला मारण्यात आलं, नंतर बॅम्ब हल्ल्यात मरण पावलेले वडील, अशा वाईट परिस्थितींचा सामना करत त्यांनी हिंमत कधी हारली नाही. त्याचप्रमाणे आजी आणि वडीलांच्या नावाचा कधीही मत मागण्यासाठी वापर केला नाही.'
लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच पक्ष प्रचाराच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आहे. बॉलिवूडकर सुद्धा चांगलेच अॅक्टीव असल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी विरोधात आहेत तर काही आपल्या आवडतीच्या पक्षात प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.