या गाण्याच्या शुटिंगनंतर ती अभिनेत्री रात्रभर रडत होती; त्यानंतर अभिताभ बच्चन म्हणाले, मी...
अभिनेत्री बिग बींसोबत कधी काम करायला मिळेल, याच्या प्रतीक्षेत असतात.
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या आज पाहिली तर सातासमुद्रा पार आहे. आजचा प्रत्येक अभिनेता, अभिनेत्री बिग बींसोबत कधी काम करायला मिळेल, याच्या प्रतीक्षेत असतात. पण त्याकाळी बिग बींसोबत एका गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर त्यांची एक अभिनेत्री रात्रभर रडत होती. त्या अभिनेत्रीचं नाव आहे स्मिता पाटील. 'नमक हराम' चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी एकत्र काम केलं. चित्रपट 19 नोव्हेंबर 1973 साली प्रदर्शित झाला होता.
'नमक हराम' चित्रपटातील 'आज रपट जाये तो...' या गाण्याच्या चित्रीकरणानंतर स्मिता पाटील रात्रभर रडत होत्या. तेव्हा बिग बींना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी स्मिता यांची समज घातली. बिग बी म्हणाले चित्रपटाच्या स्क्रिप्टची मागणी होती त्यामुळे सीन चित्रीत करण्यात आला आहे. असं बिग बी म्हणाले. त्यानंतर बिग बी आणि स्मिता यांच्या मैत्री वाढली.
त्यानंतर एक अशी घटना घडली, ज्याच्यावर तुम्हाला विश्वासच बसणार आहेत. 'कुली' चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. त्याआधी स्मिता यांच्या मनात पूर्वकल्पना आली आणि त्यांनी बिग बींची प्रकृती विचारण्यासाठी फोन केला. त्यानंतर बिग बींसोबत प्राणघातक अपघात झल्याची बातमी स्मिता यांच्या कानावर आली.
स्मिता पाटील आज आपल्यातं नाहीत. पण त्यांचं आणि बिग बींच्या ‘आज रपट जाएं तो…’ या गाण्यावर आजही अनेजण ठेका धरतात. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला. चित्रपटातील ‘के पग घुंगरू बांध मीरा नाची थी’ गाण्यांनं देखील चात्यांना वेड लावलं. चित्रपटात अनेक बड्या कलाकारांनी मुख्य भूमिका बजावली होती.
अमिताभ आणि स्मिता यांच्या शिवाय चित्रपटात परवीन बाबी, वहिदा रेहमान, शशी कपूर यांचं अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. आज हे यशस्वी कलाकार उभरत्या कलाकारांसाठी प्रेरणा स्थान आहे.