मुंबई : अभिनेते राजेश खन्ना बॉलिवूडचे एक असे अभिनेते आहेत ज्यांचे 15 चित्रपट लागोपाठ सुपरहिट ठरले होते. त्याकाळी सर्वत्र फक्त आणि फक्त राजेश खन्ना यांचीचं चर्चा असायची. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या मागे पूर्ण दुनिया वेडी झाली होती. मुली त्यांच्या नावाचं कुंकू भरत असायच्या तर प्रत्येक मुलगा त्यांच्यासारखी हेअर स्टायल ठेवायचा. चित्रपट साईन करण्यासाठी त्यांच्या दारात निर्मात्यांची लाईन असायची. तेव्हाचं एक किस्सा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. तो म्हणजे एका दिग्गज अभिनेत्याने राजेश यांच्या कानशिलात लगावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांनी राजेश यांच्या कानशिलात लगावली ते दुसरे-तिसरे कोणी नसून महमूद होते जे इंडस्ट्रीचे मोठे स्टार होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनाकडे देखील आपला मोर्चा वळवला. त्यांनी 1979साली प्रदर्शित झालेल्या 'जनता हवालदार' चित्रपटात राजेश खन्ना यांना साईन केलं होतं. चित्रपटाचं चित्रीकरण महमूद यांच्या फॉर्म हाऊसमध्ये सुरू होतं. 


तेव्हा महमूद यांचे पूत्र राजेश खन्ना यांना फक्त हॅलो बोलून निघून गेले. तेव्हा या गोष्टीचा राजेश खान्न यांना राग आला आणि त्यांनी दुसऱ्या दिवसापासून सेटवर उशिरा येण्यास सुरूवात केली. खन्नायांच्या उशिरा आल्यामुळे चित्रीकरणाचा  देखील खोळंबा होत असायचा. ते कायम सेटवर लेट येत असतं. महमूद यांना राजेश खन्ना यांची तासोंतास वाट पाहावी लागायची. 


एक दिवस महमूद यांचं त्यांच्या रागावरून नियंत्रण सुटलं आणि त्यांनी राजेश खन्नायांच्या जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाले, 'सुपरस्टार असशील तू तुझ्या घरचा, मी चित्रपटासाठी तुला पूर्ण पैसे दिले आहेत आणि तुला हा चित्रपट पूर्ण करावाचं लागेल.' तेव्हा राजेश खन्ना यांच्या डोक्यातून स्टारडम बाहेर आलं आणि ते चित्रीकरणासाठी सेटवर वेळेत यायला लागले.