मुंबई : घुमा या मराठी सिनेमातील पसायदान आता यूट्यूबवर आलं आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर चित्रित केलेली मराठी शाळांची लवकरच कशी स्थिती होईल, याचं विदारक चित्र यात मांडण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी शाळांमध्ये मुलं पाठवण्याची फॅशन, मूळ मराठी शिक्षणाला कशी मारक आहे, याचं वास्तववादी चित्र मराठी सिनेमा 'घुमा'मध्ये साकारण्यात आलं आहे. ग्रामीण गरीबांची शिकण्याची व्यवस्था आजारी पडणार आहे, गरीबांची एक पिढी सर्व शिक्षा अभियानाच्या जमान्यात शिक्षणापासून आणखी दूर जाणार आहे. ही परिस्थिती सावरण्यासाठी, वाचवण्यासाठी 'घुमा' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे, असं निर्माता आणि दिग्दर्शकाने म्हटलं आहे.