PHOTO : `टायगर जिंदा है`
अभिनेता सलमान खानचा `टायगर जिंदा है` या चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. या चित्रपटात सलमान बरोबर अभिनेत्री कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. `टायगर जिंदा है` हा चित्रपट २०१२ मधील `एक था टायगर` चा सिक्वेल असणार आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'टायगर जिंदा है' या चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. या चित्रपटात सलमान बरोबर अभिनेत्री कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. 'टायगर जिंदा है' हा चित्रपट २०१२ मधील 'एक था टायगर' चा सिक्वेल असणार आहे.
चित्रपटाच्या सेटवरचे सलमान आणि कॅटरिनाचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. सलमानचा एका फोटोमधला लूक चांगला आणि सिरिअस असा वाटतोय. या फोटोमध्ये सलमान खूपच सुंदर दिसतोय.
सलमान फोटोमध्ये खूपच सिरिअस वाटतोय
एका फोटोमध्ये सलमान बरोबर एक कलाकार दिसत आहे. त्याला बघून असं वाटते की, तो एका दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसाआधी या सेटवरचा एक फोटो लीक झाला होता. बॉलीवूड डॉट कॉमच्या मते 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे फायनल शूटिंग हे अबू धाबीमध्ये होणार आहे. सध्या सलमान बिग बॉस ११ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार
सलमान खानने डीएनएला दिलेल्या माहितीनुसार, आता मोरोक्कोमधील शूटिंग संपले आहे आणि आता अबू धाबीमध्ये चित्रपटाचे फायनल शूटिंग होणार आहे. 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. हा चित्रपट आता याच वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.