अभिनेत्री आयशा टाकियाच्या चेहऱ्याची सर्जरी; बदलेला लूक पाहून बसेल धक्का
बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. आयशा टाकियाला बॉलीवूडमध्ये वाँडेड गर्ल आणि बबली गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. आयशा टाकिया जेव्हा 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटात दिसली होती. तेव्हा तिच्या क्यूटनेसने लोक घायाळ झाले होते. यानंतर ती सलमान खानसोबत 'वॉन्टेड' चित्रपटात दिसली आणि या चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्रीने 2009 मध्ये तिचा बॉयफ्रेंड फरहान आझमीसोबत मुंबईत लग्न केलं.
लग्नानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडकडे पाठ फिरवली. मात्र आयशा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. आयशा टाकियाचा लूक गेल्या काही वर्षांत खूप बदलला आहे आणि तिच्या चाहत्यांना हे चांगलेच ठाऊक आहे. सध्या सोशल मीडियावर आयशाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा लूक बदललेला दिसत आहे.
जेव्हा हे फोटो समोर आले तेव्हा चाहत्यांना विश्वास बसत नव्हता की, ती तीच गोंडस अभिनेत्री आहे. या फोटोंमध्ये आयशा तिच्या पतीसोबत दिसत आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. ज्यामध्ये अबू फरहान आझमी तिच्या फोनकडे बघत आहे. तर आयशा कॅमेऱ्याकडे बघत स्माईल देत पोज देत आहे.
आयशा टाकियाचा हा नवा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. फोटोवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, ''तुम्ही आधीच सुंदर होता. सर्जरीची काय गरज होती? तर तिथे आणखी एका यूजरने लिहिलं की, "बॉलिवूड अभिनेत्रींकडूनच सुंदर चेहरा खराब करायला शिका".
अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचं झालं तर, आयशा टाकियाने टार्झन द वंडर कारमधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला पुरस्कारही मिळाला होता. आयशाने बॉलिवूडशिवाय तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'सुपर' या तेलुगू चित्रपटासाठी आयशाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठीही नामांकन मिळालं होतं.