बच्चेकंपनीसाठी बालनाट्य ‘टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’
यंदाची उन्हाळ्याची सुट्टी रंगतदार कशी करणार असा प्रश्न बच्चेकंपनी समोर आहे. तर त्यांच्यासाठी डोरेमॉनच्या गॅजेट सारखेच एक नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे.
मुंबई : यंदाची उन्हाळ्याची सुट्टी रंगतदार कशी करणार असा प्रश्न बच्चेकंपनी समोर आहे. तर त्यांच्यासाठी डोरेमॉनच्या गॅजेट सारखेच एक नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे. “टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी” असे या नाटकचे आहे. बालमित्रांसाठी थिएटर कोलाज निर्मित, अपूर्वा प्रोडक्शन हे बालनाट्य सादर करत आहेत. शनिवारी ११ मे रोजी सकाळी १० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे पहिला प्रयोग पार पडणार आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात बच्चकंपनीसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन, मूळ कथा, संकल्पना पल्लवी वाघ-केळकर यांनी केले आहे. नेपथ्य मार्गदर्शन सचिन गावकर, संगित अनुराग गोडबोले, प्रकाश योजना योगेश केळकर, रंगभूषा उल्हेश खंदारे या सर्वाच्या मेहनतीने हे नाटक प्रेक्षकांच्या समोर सादर होत आहे. एकूण २६ लहान मुले या नाटकात आपली व्यक्तीरेखा साकारणार आहे. या बालनाट्यामध्ये सिद्धीरुपा करमरकर आणि अक्षय शिंपी या अनुभवी कलाकारांचा विशेष सहभाग आहे. सुमुख वर्तक यांनी या बालनाट्याच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
आज पालकांचा आपल्या पाल्यांना बालनाट्यशिबीरांना पाठविण्याचा नेमका उद्देश कोणता? बालनाट्यांमधून खरोखर नाट्यसंस्कार होतात का? बालनाट्यामधील तांत्रिक गोष्टींचा सहभाग याविषयी मुलांना सांगितले जाते का? टीवी चॅनल्स, फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि गॅझेट्सच्या जमान्यात बालनाट्ये शिबीरापुरतीच मर्यादीत असावीत का? व्यावसायिक नाट्यनिर्माते बालनाट्यनिर्मितीसाठी पुढे का येत नाही? या सर्वांचा विचार करूनच हे नाटक साकारल्याचे मत पल्लवी वाघ-केळकर यांनी व्यक्त केले.