प्रेयसीच्या प्रेमात सलमान `आवारा`
`मांगे फकीर दुवाएं अल्लाह, यार दी सूरत माशाअल्लाह...`
मुंबई : 'मांगे फकीर दुवाएं अल्लाह, यार दी सूरत माशाअल्लाह...' प्रेमावर आधारित 'दबंग ३' चित्रपटातील 'आवारा' गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग ३' चित्रपटाची उत्सुकता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. याचा प्रत्येय 'आवारा' गाण्याच्या माध्यमातून होत आहे. सलमानने गाण्याचा ऑडिओ प्रदर्शित केला आहे.
परंतु, या गाण्यात सलमान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर पैकी कोणासोबत रोमांन्स करताना दिसेल, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जेष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची कन्या 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई झळकणार आहे. तर 'आवारा' गाण्यासाठी फोटो सई आणि सलमानचा लावण्यात आला आहे. त्यामुळे या गाण्यात सई झळकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.