मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत राधे योर मोस्ट वॉन्टेड(Radhe Your Most Wanted Bhai) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने यंद्याच्या वर्षी देखील त्याच्या चाहत्यांसाठी राधे चित्रपटाच्या रूपात ईदी आणली आहे. सर्वच जण सलमानच्या आगामी  चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. नुकताच चित्रपटाचं 'सीटी' मार गाणं प्रदर्शित करण्यात आलं. आता चित्रपटाचं दुसरं गाणं  'दिल दे दिया'  प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 



'दिल दे दिया' गाण्यात सलमानसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस थिरकताना दिसत आहे. गाणं प्रदर्शित होताच तुफान व्हायरल होत आहे. गाण्यात सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री दिसून येत आहे. सलमान आणि जॉकलिन शिवाय गाण्यात अभिनेता रणदीप हुड्डा देखील दिसत आहे. 


'राधे' शिवाय सलमान खाननं 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. या सिनेमात भाईजान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत ऑनस्क्रीनवर रोमान्स करताना दिसणार आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानने शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचं वेळापत्रकही पूर्ण केलं आहे.