मुंबई : 'स्टुडंट ऑफ द इयर' च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर २' चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटातील 'जवानी दिवानी' सॉन्ग प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटातील गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफसोबत दोन ग्लॅमरस अभिनेत्री अनन्या पांडे, तारा सुतारिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. मोठ्या पडद्यावर हे त्रिकूट पहिल्यांदाच भूमिका साकारताना दिसणार आहे. 'जवानी दिवानी' गाण्यामध्ये टायगर, अनन्या आणि तारा यांचा दमदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता वरूण धवण, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जवानी-दीवानी' या गण्याचा रिमेक 'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटात साकारण्यात येणार आहे. आता हा चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.