Tanusha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tanusha Sharma)  आत्महत्या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच आता तुनीषा शर्मा हत्या प्रकरणातील आरोपी शीझान खान(sheezan khan) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठाडीत शीझानचे केस कापले जाणार आहेत(Crime News). मात्र, शीझानचे वकिल त्याला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीझान खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नंतर सोमवारी शीझानच्या वकिलांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर 7 जानेवारीला सुनावणी होणार  असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. 31 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत शीझानच्या वकीलांनी चार अर्ज दाखल केले होते. न्यायालयीन कोठडीत इतर आरोपींप्रमाणे शीझानचे केस कापू नये,  शीझानला पोलिस सुरक्षा द्यावी. सोबतच त्याला लागणाऱ्या औषधं व घरातील जेवणाची व्यवस्था करून द्यावी. मीडिया शीझानला ट्रोल करणे बंद करावे अशा मागण्या या अर्जाद्वारे करण्यात आल्या आहेत. 


शीख समाजाच्या आरोपीची केस आणि मुस्लिम समाजाच्या आरोपीची दाढी कापता येत नाहीत असा कारागृहाचा  नियम असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शीझानच्या केस कापण्यावरून पुन्हा कोर्टात युक्तीवाद होणार असल्याचे त्याच्या वकिलानी सांगितले आहे.


काय आहे  तुनीषा शर्मा मृत्यू प्रकरण?


तुनिषा शर्मा ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. 24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषाने भाईंदर येथे शुटींगच्या सेटवरच आत्महत्या केली. 24 डिसेंबरच्या दिवशी सेटवरच तुनिषाने शीझानच्या मेकअप रुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीझान आणि तुनिषाने एकत्र लंच केला. त्यानंतर शीजान शुटिंगसाठी सेटवर गेला. या लंचदरम्यानच शीझान आणि तुनिषामध्ये काहीतरी बिनसल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळेच तुनिषाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  तुनिषा आत्महत्याप्रकरणी शीझान खानवर आरोप करण्यात आले आहेत. तुनिषाच्या आईने शीजान खानविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शीजान खानला अटक करण्या आली. शीजानवर तनुषाला धोका दिल्याचा तसंच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 


तुनिषा आणि शीझान कुटुंबीयांमध्ये वार प्रहार 


टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येनंतर आता तुनिषा आणि शीझान कुटुंबीयांमध्ये वार प्रहार सुरू झाले आहेत.  तुनिषाची आई आणि शीझानच्या आईमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यायेत. तुनिषाचं धर्मपरिवर्तन केलं जाणार होतं असा आरोप तिच्या आईने केलाय. तर शीझानच्या आईनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. 


लव्ह जिहादचा अँगल 


यात लव्ह जिहादचा अँगल असल्याचा दावा तुनिषाच्या मामाने केला आहे.  पोलिसांनी आता त्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे(Tunisha Sharma Death Case). शीजानशी मैत्री झाल्यानंतर तुनिषामध्ये बरेच बदल झाले होते. शीझानशी मैत्री झाल्यावर तुनिषा हिजाब घालायला लागली होती, अशी माहिती तुनिषाच्या मामांनी दिली आहे.