मुंबई : बोल्ड सिझलिंग आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा आज आपला वाढदिवस साजरा करतेय. निया अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. नियाने आपल्या कामातून स्वत:ला कायमच सिद्ध केलं आहे.  ती टिव्ही इंडस्ट्रीमधील टॅलेंटेड अभिनेत्रीपैकी एक आहे. निया आपल्या बोल्ड लूक्स, फॅशन सेंसमुळे चर्चेत असते. याला घेवून ती कायम ट्रोल देखील होते.  निया अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. चला तर मग जाणून घेवुयात नियाबद्दल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निया संबधित सगळ्यात मोठा वाद निर्माण तेव्हा झाला होता जेव्हा तिने बेस्ट फ्रेंड रेहाना मल्होत्राला किस केलं होतं. होळीच्या फंक्शमध्ये निया आणि रेहानाने एक-दुसऱ्यांसोबत लिपलॉक केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.


नियाला लोकांनी आपल्या बेस्ट फ्रेंडला किस केल्यामुळे खूप ट्रोल देखील केलं होतं. यावर स्पष्टीकरण देत नियाने सांगितलं की, आता तिने किस केलं तर यात काय विशेष आहे. नियाने रेहानाला आपली बहिण मानल्याचं देखील तिनं सांगितलं होतं. 


निया शर्माचे आऊटफिट कायमच बोल्ड आणि रिवलिंग असतात. निया कधी ब्रालेट आऊटफिट घातल्यामुळे चर्चेत होती. तर कधी बॅकलेस टॉपमुळे चर्चेत असते.  जिथे गोष्ट फॅशनची येते. निया एक्सपोज करण्यासाठी आणि आपली स्लिम बॉडीला फ्लॉन्ट करण्यासाठी देखील लाजत नाही.


निया शर्माने गेल्यावर्षी आपला ३०वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा नियाच्या या केकचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. नियाच्या केकला लोकांनी वल्गर म्हणत तिच्यावर टिकी देखील केली होती. या केकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.