मुंबई : टीव्हीची बोल्ड अभिनेत्री निया शर्मा सध्या तिच्या नव्या 'फुंक ले' गाण्याचे जोरदार प्रमोशन करत आहे. दररोज ती याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता या गाण्याच्या प्रमोशनसाठी नियाने असे पाऊल उचलले की, ज्याने हा व्हिडिओ आणि हे गाणं चांगलच व्हायरल झालं आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.


रस्त्यावर उतरली निया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीची सुपर बोल्ड अभिनेत्री निया शर्मा या व्हिडिओमध्ये रस्त्यावर खुलेपणाने डान्स करत आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत नाचणारे लोक ऑटो रिक्षावाले आहेत. ती त्यांना 'फुंक ले' म्हणत डान्स करत आहे.


रिक्षाचालकांसोबत थिरकली निया 


गाण्याच्या प्रमोशनसाठी निया शर्मा रस्त्यावर रिक्षाचालकांसोबत जबरदस्त डान्स करताना दिसली. व्हिडिओमध्ये अभिनेत्री नुकत्याच रिलीज झालेल्या 'फुंक ले' गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसली. यामध्ये तिने अतिशय टाईट कपडे देखील घातले आहेत. त्यामुळे देखील ती चर्चेत आली आहे. 


टाईट कपडे घालून डान्स 


या व्हिडिओमध्ये निया शर्माने क्रॉप लूकमध्ये ब्लॅक टाइटसह पांढरा शर्ट घातला आहे. यासोबतच तिच्या ड्रेसला मॅचिंग करत तिने गॉगल लावला आणि केस मोकळे सोडले आहेत. नियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे.


बिग बॉस १५ मध्ये दिसली निया 


काही दिवसांपूर्वी निया तिच्या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी 'बिग बॉस 15'मध्ये पोहोचली होती. शोमध्ये नियाने स्टेजवर सलमान खानसोबत जबरदस्त डान्सही केला होता. शोमध्ये निया 'फुंक ले'वर डान्स करत दाखल झाली होती.


यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. नियाने हलका मेकअप, मोठे कानातले आणि मोकळे केस यामुळे तिचा लूक अतिशय सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये सलमान खानने नियाला मजेशीर प्रश्नही विचारले.


या शोच्या माध्यमातून सुरू केलं करिअर 


निया शर्माने 'एक हजारों में मेरी बहना है' या शोमधून करिअरची सुरुवात केली होती. या शोमधील तिचे काम खूप आवडले होते. या शोमधून नियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. याशिवाय निया 'जमाई राजा', 'इश्क में मरजावां' आणि 'नागिन' सारख्या शोचा भागही आहे.