मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. निया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नियानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निया झलक दिखलाच्या टीमसोबत असल्याचे दिसत आहे. यावेळी नियानं ऑफ व्हाईट रंगाचा टू पीस परिधान केला आहे. निया काला चष्मा या गाण्यावर इतर काही स्पर्धकांसोबत डान्स करताना दिसत आहे. 


'झलक दिखलाजा'च्या यंदाच्या पर्वात निया स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. नियाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, तिला ट्वर्क करता येत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, 'हिला डान्स करता येतो का?'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


निया ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर तिनं आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय निया तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे देखील ओळखली जाते. 2017 च्या आशियायी सेक्सी वुमन्सच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. 


नियानं 'काली' या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलं. नियाला 'एक हजारों में मेरी बहन है' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये निया आणि क्रिस्टल डिसूजा यांनी एकत्र काम केलं आणि दोघांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. आजही दोघींमध्ये बहिणींसारखं प्रेम असून रक्षाबंधनाला त्या एकमेकांना राखी बांधताना दिसतात.