मुंबई : टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. निया नेहमीच स्वत:चे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने पुन्हा एकदा आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 
  
टीव्ही अभिनेत्री निया शर्माने तिच्या हॉटनेसने इंटरनेटचा पारा चढवला आहे. ती अनेकदा तिच्या नव्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. आता अतिशय छोटे कपडे परिधान करून तिने तिचे असे फोटो क्लिक केले आहेत की चाहत्यांच्या मनात खळबळ उडाली आहे. त्याचे हे फोटो पाहून चाहत्यांनी उसासे सोडायला सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


निया शर्माने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये निया हॉट दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये निया आरशासमोर खुर्चीवर बसून सेल्फी काढताना दिसत आहे. दुसर्‍या फोटोमध्ये निया आरशासमोर उभी असून तिचे हॉट फिगर फ्लॉंट करत आहे. तिच्या या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत.  


निया शर्माच्या या फोटोंवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, हॉटनेस. आणखी एक टिप्पणी, सेक्सी. काहींनी तिला रेड क्वीन म्हटले आहे, तर काहींनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.