महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी समुद्र किनारा; गुहेत शिरते लाट; दूरवर ऐकू येते कोंडुऱ्याची गाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा समुद्र किनाऱ्याचा लाटांचा आवाज दूरवर ऐकू येणारा आवाज रहस्यमयी का वाटतो जाणून घेऊया. 

| May 04, 2024, 22:54 PM IST

Kondura Beach Sindhudurg : कोकण म्हटल्यावर डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग समुद्र किनाऱ्याचे नयनरम्य दृष्य. समुद्र किनाऱ्यावर लाटांचा आवाज ऐकताना मन हरखून जाते. मात्र, कोकणात एक असा समुद्र किनारा आहे ज्याचा लाटांचा आवाज खूपच रहस्यमयी वाटतो.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा समुद्र किनारा हा खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

1/7

कोकणातील सुंदर समुद्र किनारे मन मोहून टाकतात. मात्र, सिंधुदुर्गमध्ये एक असा समुद्र किनारा आहे जो फक्त सौंदर्यच नाही तर त्याच्या रहस्यामुळे पर्यटकांना अंचबित करतो.

2/7

पूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी वेगाने कोंडुऱ्या किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत घुसायचे. त्योवळी मोठा आवाज यायचा. तो दूरवर ऐकायला यायचा. याला ‘कोंडुऱ्याची गाज’ म्हणतात.  

3/7

या किनाऱ्यावर दगडांवर समुद्राने केलेले कोरीवकाम पहायला मिळते. समुद्राच्या लाटांनी दगड फोडून विवर बनवली आहेत. यात समुद्राच्या लांटाचे पाणी खळाळते. 

4/7

पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे खडक हे कोंडुरा समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य आणखी खुलवतात.

5/7

 विस्तीर्ण समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि लिंगेश्वराचे प्राचीन देऊळ आहे. 

6/7

 वेंगुर्ला तालुक्यापासून बारा किलोमीटरच्या अंतरावर हा किनारा आहे.   

7/7

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा समुद्र किनारा आहे. चिं. त्र्य. खानोलकरांची प्रसिद्ध ‘कोंडुरा’ या कादंबरीत या समुद्र किनाऱ्याचे रहस्य वर्णन पहायला मिळते.