निक जोनसने धरला पंजाबी गाण्यावर ताल
परिणितीने व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती गायक निक जोनस सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या निकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री परिणिती चोप्राचा 'जबरिया जोडी' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
चित्रपटातील 'खडके ग्लासी' या पंजाबी गाण्यावर त्याने चांगलाच ताल धरला. सध्या इन्टरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. अभिनेत्री परिणितीने त्याचा व्हिडिओ स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे.
चौदा तासांपूर्वी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ८ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे. निकला बॉलिवूड आणि पंजाबी गाणी फार आवडत असल्याचे प्रियांकाने सांगितले. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ती म्हणाली होती.
प्रियांका - निकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आसतात. गत वर्षी हे जोडपं विवाह बंधनात अडकले. प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' सध्या बॉक्स ऑफीसवर सध्या चांगलीच मजल मारताना दिसत आहे.