Video : निक जोनसच्या जीवाला धोका? लाईव्ह कार्यक्रमामधून काढला पळ
पॉप स्टार निक जोनसची गाणी जगभर प्रसिद्ध आहेत. सध्या निक जोनस म्युझिकल वर्ल्ड टूरवर आहे. अलीकडेच, प्रागमध्ये एका शोदरम्यान तो स्टेजवरून पळून गेला. नेमकं त्या ठिकाणी काय घडलं? वाचा सविस्तर
Nick Jonas : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. प्रियंकासोबत लग्न झाल्यानंतर त्याच्या फॉलोअर्समध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या निक जोनस म्युझिकल वर्ल्ड टूर कॉन्सर्टवर आहे. निक जोनससोबत त्याचा भाऊ केविन आणि जो जोनस यांच्यासोबत तो वेगवेगळ्या शहरात जाऊन तो त्याची गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याची पॅरिसमध्ये कॉन्सर्ट झाली होती. त्यानंतर आता निक जोनसची प्रागमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. पण इथे तो परफॉर्मन्स चालू असतानाच स्टेजवरून पळून गेला.
निक जोनसचा जीव धोक्यात?
सध्या प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याला पाहून चाहत्यांनी देखील त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वास्तविक, निक जोनस प्रागमध्ये केविन आणि जोसोबत एका लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करत होता. त्यावेळी कोणीतरी त्याला लेझरने लक्ष्य केले. हे पाहून निक जोनस प्रचंड घाबरला आणि तो लाईव्ह कार्यक्रमातून पळू लागला.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं?
निक जोनसच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्याला गर्दीतून कोणीतरी लेझर लाईट दाखवली आहे. ज्यामध्ये कधी त्याच्या डोक्यावर तर कधी त्याच्या चेहऱ्यावर लक्ष्य केले जात आहे. हे सर्व पाहून निक जोनस प्रचंड घाबरला आणि तो लाईव्ह शोमधून पळू लागला. यावेळी त्याने हाताने शो थांबवण्याचे संकेत देखील दिले. तर त्याच्यासोबत परफॉर्मन्ससाठी आलेले जो आणि केविन स्टेजवर उभे राहिले. दुसरीकडे, नंतर सुरक्षा पथकाने त्या व्यक्तीला बाहेर काढले.
घटनेनंतर चाहते काय म्हणाले?
निक जोनसने ही घटना समजताच स्वत: ला वाचवले. पण चाहत्यांनी गायकाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावर एका चाहत्याने म्हटलं आहे की, तुम्हाला निक जोनसकडे लेझर का दाखवायचे आहे? मला जे समजले त्यावरून यामुळे शो काही मिनिटांसाठी थांबवला गेला. म्हणून त्यांनी वेळ संपण्याचे संकेत दिले. लोकांना ते देखील कळले नाही का? असा प्रश्न चाहते करत आहेत.