मुंबई : प्रियंका चोप्राने 1 डिसेंबर 2018 रोजी हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनससोबत लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 4 वर्षे झाली आहेत. या दोघांचा विवाह 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पार पडला. नुकतेच या दोघेही सरोगसीद्वारे एका गोंडस बाळाचे पालक झाले आहेत. हे जोडपे सध्या अमेरिकेत राहातात. प्रियांका जेव्हा अमेरिकेत एका प्रोडेक्टसाठी गेली होती, त्यादरम्यान तिची निक जोनससोबत मैत्री झाली. काही वर्ष एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


हे सगळं कदाचित तुम्हाला माहित असेल, परंतु यापूर्वी निक जोनसबाबत फार कमी लोकांना ठाऊक असावं. प्रियांका चोप्राला भेटण्यापूर्वी निक जोनास इतर अनेक गर्लफेंडसोबत रिलेशनशिपमध्ये राहत होता.


शाळेत जाण्याच्या वयात निक जोनासच्या आयुष्यात पहिली गर्लफ्रेंड आली. त्यावेळी तो फक्त 14  वर्षांचा होता. जून 2006 ते डिसेंबर 2007 पर्यंत, त्याचं हे नातं टिकलं.


जोनसच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे नाव मायली सायरस होते. ती डिस्ने स्टार आणि अमेरिकन गायक अभिनेत्री देखील आहे. एका मुलाखतीत, त्याला जेव्हा कोणाला पहिलं किस केलं होतं असं विचारलं गेलं तेव्हा त्याने मायलीचं नाव घेतलं.


2008 मध्ये निक जोनास पुन्हा प्रेमात पडला, या गर्लफेंडचे नाव होते सेलेना गोमेज. सेलेना निकच्या म्युझिक व्हिडिओ बर्न अपचा एक भाग होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले  नाही आणि 2011 मध्ये पुन्हा निक जोनास ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेमच्या प्रेमात पडला. त्यांचे नाते देखील 10 महिने टिकले, त्यानंतर 2012 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.


2013 मध्ये निक फॅशन जगतातील लोकप्रिय मॉडेल ऑलिव्हिया कल्पोच्या प्रेमात पडला होता, परंतु हे नाते 2 वर्षे टिकले, त्यानंतर ते दोघे वेगळे झाले, शेवटी प्रियंका चोप्राने  त्याच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. ज्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


निकने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोज केले, या दोघांची पहिली भेटही एका इव्हेंटमध्ये झाली जिथे दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.