मुंबई : एक मुलगी, अभिनेत्री पत्नी झाल्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आई झाली आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने सरोगसीच्या माध्यमातून नव्या पाहुण्यातं स्वागत केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रियंकाने दोन महिन्यांपूर्वी आई होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीचं  प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई झाल्याचं सांगितलं. ज्यानंतर तिच्यावर आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका आणि निक जोनास यांच्या मुलीच्या जन्माने चाहत्यांना वर्षातील सर्वात मोठी भेट दिली आहे. या जोडप्याच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान निकचा एका बाळासोबत फोटो व्हायरल होत आहे.



निकच्या हातात जे बाळ आहे, ते दोघांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सत्य वेगळं आहे. फोटोमध्ये दिसणारं बाळ निक आणि प्रियंकाचं नसून फोटो फार जुना आहे. जो आता  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर युजर्स  दोघांचे अभिनंदन करत आहेत. बाळाला गोंडस म्हणत आहेत. व्हायरल फोटोमध्ये निक आणि प्रियांकाला कदाचित बाळ नसेल, परंतु प्रत्येक जण जोडप्याच्या छोट्या राजकुमारीची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.