मुंबई : अनेक वर्षांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या शोला अलविदा करणारी निधी भानुशाली नेहमी चर्चेत असते. या शोनंतर निधी इतर कोणत्याही शोचा भाग बनली नाही किंवा त्याबद्दल कोणतीही बातमी नाही. मात्र तरीही निधी भानुशालीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.  यावेळी निधी तिच्या मेकओव्हरमध्ये मग्न आहे. शॉर्ट हेअर आणि नाकात नथ तसंच कानात झुमके घातलेली निधी खूपच वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निधिने बदलला आपला लूक
निधी भानुशाली खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस देखील आहे. ती अनेकदा तिच्या लूकवर अनेक प्रयोग करताना दिसते. आता एकदा तिचा फोटो शेअर करून निधीने ती खरंच फॅशन दिवा असल्याचं दाखवून दिलं आहे. नुकताच शेअर केलेल्या फोटोंमध्ये निधी तिच्या लहान केसांसह दिसत आहे. डेनिम शॉर्ट्स आणि टॉप स्टाईलमध्ये पोज देणारी निधीची ही स्टाइल काही सोशल मीडिया यूजर्सना आवडली आहे, तर काही जण तिला या स्टाइलसाठी ट्रोल करत आहेत.


बिकिनी लूकमध्येही निधीचा बोलबाला
निधीची गणना टेलिव्हिजनच्या बोल्ड ब्युटीजमध्ये केली जाते. जी अनेकदा तिच्या बिकिनी लुक्सने चर्चेत असते. तिला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. निधी अनेकदा तिचे व्हेकेशन फोटो शेअर करते. निधीच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर कळतं की तिला जंगल, हिरवागार निसर्गाच्या जवळ राहायला आवडतं.



ती अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर, जंगलात तसंच अतिशय अनोख्या पर्यटनस्थळावर दिसते. तारक मेहता का उल्टा चष्मानंतर निधी भानुशाली इतर कोणत्याही मालिकेत दिसली नाही. मात्र असं असूनही ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.