मुंबई: बॉलिवूड किंग खान शाहरुख खानच्या चाहत्यांचे जाळे संपूर्ण विश्वात पसरलेले आहे. आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर शाहरुखने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नायजेरिन मुलांनी त्यांच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तयार केला. १९९७ साली प्रदर्शित झलेल्या 'दिल तो पागल है' सिनेमातील लोकप्रिय गाणे 'भोली सी सूरत' या गाण्यावर थिरकताना ही नायजेरिन मुले दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही नक्की आनंद मिळेल.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


नायजेरिन मुलांना हिंदी भाषेचे ज्ञान अवगत नसतानाही त्यांनी हिंदी गाण्यावर ताल धरल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला पाहून आपण अंदाज लावू शकतो की या मुलांनी गाण्यासाठी विशेष मेहनत घेलली आहे. अली गुल खान नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहले, 'मी तुम्हाला सांगत आहे, नायजेरिन आपल्या देसी लोकांपेक्षा जास्त बॉलिवूड पाहतात. हे मुले पून्हा असाच एक धमाकेदार व्हिडिओ घेवून परत येणार आहेत.'



 


याआधी शाहरुखच्या 'कल हो न हो' सिनेमातील टायटल सॉन्गचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 'भोली सी सूरत' गाण्यालाही नेटकऱ्यांकडून चांगल्या प्रतिक्रीया मिळत आहेत.


डिसेंबरमध्ये प्रदर्शित झलेला शाहरुखचा 'झिरो' सिनेमा चाहत्यांचे विशेष मनोरंजन करू शकला नाही. सिनेमात अनुष़्का शर्मा आणि कतरिनी कैफ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले.