Maharashtrachi Hasyajatra fame Nikhil Bane : उन्हाळ्याची सुट्टी संपत आली असून अजूनही मुलांना ही गावाची ओढ लागली आहे. कोणाला परत शाळेत जायची इच्छा होत नाही. अजूनही बऱ्याच लोकांना गावीच रहायचं आहे. तर ऑफसला जाणारे ज्यांना उन्हाळ्यात सुट्ट्या मिळाल्या नाही ते आता गावी जायला निघाले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांना गावाची ओढ सतावत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात ही तिच्या गावी कोकणात गेली होती. तिनं तिच्या गावाचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. आता या कार्यक्रमातील आणखी एक कलाकारा कोकणात त्याच्या गावी पोहोचला आहे. त्यानं त्याच्या या गावचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सगळ्यांना हसवणारा अभिनेता निखिल बने हा एका सर्वसाधारातून कुटुंबातून असून तो आता त्याच्या गावी गेला आहे. निखिलनं त्याच्या गावचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निखिलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सगळ्यात आधी निखिलनं त्याच्या गावच्या घराचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याचं सुंदर असं कौलारू घर निखिलनं दाखवलं आहे. हा फोटो शेअर करत तो चिपळुनला गेला आहे असं त्यानं लोकेशन देखील टाकलं आहे. निखिल इथेच थांबला नाही तर त्यानं त्याच्या चाहत्यांसाठी कोकणची सुंदरता दाखवली आहे. त्याचे फोटो देखील त्यानं शेअर केले आहेत. 



निखिलनं शेअर केलेले हे फोटो त्याच्या फॅनपेजवर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहता अनेक नेटकऱ्यांनी त्यांनाही गावी कोकणात जायचं आहे असं सांगितलं. इतकंच नाही तर अशात निखिलनं शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी आम्ही पण चिपळूनचे आहोत असे म्हटले. निखिल आधी जेव्हा वनिता खरात तिच्या गावी गेली होती तेव्हा देखील अनेक चाहत्यांना तिलाही अशाच कमेंट केल्या होत्या. 



हेही वाचा : "ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे निखिल घराघरात पोहोचला. निखिलनं सगळ्यांच्या मनात स्वत: ची एक जागा निर्माण केली आहे. त्याचे इन्स्टाग्रााम अकाऊंटवर हजोरा चाहते आहेत. तर 81.4K त्याचे इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स आहेत. निखिल हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत निखिल चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे फोटो आणि मजेशीर रील सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात.