Bigg Boss Marathi Season 5 : सध्या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. सिनेकलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सला संधी दिल्याने सध्याचा सिझन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, सध्या या शोमध्ये वारंवार मराठी कलाकारांचा होत असलेल्या अपमानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीने आता पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडीचा त्याच्या अभिनयावरून अपमान केला आहे. त्यामुळे आता मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून यावर संताप व्यक्त केलाय.


विशाखा सुभेदार म्हणते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना 'जोकर' म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप, अशी टीका विशाखा सुभेदारने केली आहे. 


काय म्हणाला अभिजीत केळकर?


होय आमचा पॅडी 'जोकर'च आहे. ठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा असा आमचा पॅडी... पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळया सगळ्याचा वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस, असा उल्लेख करत मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकरने जान्हवी आणि निक्कीवर टीका केली आहे.