मुंबईः निक्की तांबोळीचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. हाय हिल्स आणि शॉर्ट ड्रेसमध्ये ही अभिनेत्री कार्यक्रमात पोहोचली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट लूकमुळे अभिनेत्रीचा बोलबाला आहे. निक्की तांबोळी नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली,
या कार्यक्रमातील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.



हाय हिल्स आणि शॉर्ट ड्रेसमध्ये आलेल्या निक्कीला मात्र ड्रेस सावरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं व्हिडीओतून दिसतंय. तसंच मोकळे केस सोडून आणि न्यूड मेकअप करून तिनं हा लूक पूर्ण केला आहे.  लूकवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या लूकमध्ये निकी खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचं म्हणणे आहे.



निक्की तांबोळीने तिच्या लूकचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पहिल्यांदा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे आणि नंतर ती तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना दिसत आहे. निक्की सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसोबत एकापेक्षा एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.