मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवुडमधील लॉबिंग आणि नेपोटिझमवर चर्चा होऊ लागलीय. सुशांत सिंह राजपूतला काही प्रोडक्शन्सनी बॅन केलं होतं. सुशांतने देखील ही भीती बोलून दाखवली होती. दरम्यान याच पार्श्वभुमीवर नील नितीन मुकेश सध्या सोशल मीडियात चर्चेत आलायं. एका अवॉर्ड सेरेमनीती सैफ आणि शाहरुख नील नितीन मुकेशची खिल्ली उडवतानाचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर शेअर केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये शाहरुख नीलला प्रश्न विचारतो की तुझ्या नावात आडनाव कुठेयं ? खान, रोशन अशी आडनाव असतात पण तुझ्या नावात सरनेम कुठेयं ? असा खोचक प्रश्न विचारला गेला. त्याला नील नितीन मुकेशने खरमरीत उत्तर दिले. 



मला कोणत्या आडनावाची गरज नाही. माझे वडील माझ्या बाजुला बसलेयत आणि तुम्ही माझा अपमान करताय. त्यामुळे शट अप एवढंच मी तुम्हाला म्हणेन असे नील यावेळी म्हणाला. 


तरीही पुन्हा सैफने त्याला आडनावावरुन छेडले. ते ठिकंय पण तुझं आडनाव काय ? असा प्रश्न विचारला. त्यावरही निल शट अप असे उत्तर देऊन खाली बसला. 


त्यावेळी, इतकं शट अप, शट अप बोलतोय. याने पुढचे सिनेमा विनोद चोप्रा, आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत साईन केलाय वाटतं असा शाहरुख सैफला म्हणाला. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये शाहरुख, सैफ यांच्यावर टीका होतेय. 


आयफा अवॉर्डमधला सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडीओ देखील या दरम्यान शेअर होतोय.



ज्यामध्ये शाहीद कपूर आणि शाहरुख खान मिळून सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवताना दिसतायत.  हा व्हिडीओ देखील सोशल मीडियात चर्चेत आहे.