मुंबई :  'झी मराठी' प्रस्तुत आणि राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटरची निर्मिती असलेल्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकानं सध्या रंगभूमीवर एक वेगळीच बहार आणली आहे. या नाटकाचा २५ डिसेंबरला ७७७ वा प्रयोग पार पडतोय. चिन्मय मांडलेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'अलबत्या गलबत्या'नं अल्पावधीतच ७७७ व्या प्रयोगाकडे धमाकेदार वाटचाल सुरू केली आहे. सध्या रंगभूमीवर बालनाट्यांची अवस्था फार बरी नाही हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर 'अलबत्या गलबत्या'ला मिळणारा उदंड प्रतिसाद आणि नाट्यगृहाबाहेर झळकणारे ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड त्याचं यश अधोरेखित करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यात चिंची चेटकीण हे कॅरेक्टर खूप लोकप्रिय ठरलं आहे. हे पात्र आधी दिलीप प्रभावळकर पार पाडत होते. नंतर हे पात्र वैभव मांगलेने उचलून धरलं. त्याचं हे पात्र फार कमी वेळीत लोकप्रिय झालं. मात्र वैभवने अचानक या नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मात्र कमालीचा धक्का बसला. अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली. मात्र तरिही हे नाटक हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवत आहे. सध्या चिंची चेटकिण हे लोकप्रिय पात्र अभिनेता निलेश गोपनारायण फार उत्तमरित्या पार पाडत आहे. याच विषयी आम्हाला दिलेल्या मुलाखतीत निलेश व्यक्त झाला आहे.


आम्हाला दिलेल्या मुलाखतीत निलेश याविषयी पहिल्यांदाच बोलला आहे. व्यक्त होत निलेश म्हणाला, ''वैभव दादांनी जे आधी केलं होतं त्याच्याही आधी हे नाटक दिलीप प्रभावळकर यांनी केलं होतं आणि आता मी. मग एक मोठी जबाबदारी येते की, एक भार असतो तो जो पेलवून न्यायचा असतो. ती करत असताना एक बर्डन असतं की, माझे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर माझे निर्माते राहूल भंडारे यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला तो बुस्ट केला की हे तु करु शकतोस. आणि सरावने ते हळू-हळू ती धार येत गेली. जेवढं प्रेम महाराष्ट्राने दिलीप काकांना वैभव दादाला दिल त्याच्यापेक्षाही जास्त किंवा तेवढंच प्रेम मला महाराष्ट्राची जनता देतेय. प्रेक्षक बालप्रेक्षक माझा देतोय. 


ती गंमत येतेय की, असं म्हणतात काही काही लोकं तुमचा आवाज सेम वैभव मांगले सारखाच आहे. पण डबिंग वैगरे तसं काही नाही. खंरतर तसं काही होत पण नाही थिएटरमध्ये डबिंग ते शक्यच नाहीये. खरंतर नाशिकच्या एका प्रयोगाला असं झालं होतं की, हे खोटं बोलतायेत यांनी वैभव मांगलेचं रेकॉर्डिंग लावलंय आणि ही फक्त तोंड हलवतेय. अशी झाली होती गंम्मत. तर त्यांना मग म्हटलं इथे या काय झालंय. त्यांना बोलून दाखवलं इन्टरवलला मग त्यांना पटला विश्वास की ही व्यक्ती आवज स्वत: काढतो. खरंतर काय आहे की, चेटकीणीचा आवाज काढायचा म्हणजे तो तसाच काढावा लागतो त्याला काही वेगळं आवाज येत नाही. माझा आणि दादाचा वॉईस स्टेक्चर सेम असल्यामुळे ते सेम वाटत असेल पण तो काही विषय नाही आपला. आपला विषय चेटकिण महत्वाची,नाटक महत्वाचं आहे.



आज मी दिलीप काका, वैभव मांगले आणि मी निलेश गोपनारायण माझ्यानंतरही जो कोणी करेल तोही असाच हिट होणार कारण हे कॅरेक्टर हा गेटअप, ही रंगभूषा हे खूप मॅटर करतं. हे जेव्हा येतं ना माणसाच्या अंगावर चढतं तेव्हा खूप मॅटर करतं. आणि तेव्हा हे वाटतं की नाही ही ती चेटकिण आहे. करणार पात्र हिट असण्यापेक्षा ते नाटकंच हिट आहे. तर ते कोणीही केलं तरिही त्याला तितकाच बालप्रेक्षकांकडून मोठ्या प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळणार आहे. त्यात काही वेगळा फरक पडणार नाही.'' असं निलेश गोपनारायणने आम्हाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.