मुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे. सर्व प्रेक्षकांना हास्याचा व मनोरंजनाचा डबल डोस देणाऱ्या कार्यक्रमाचे ४०० भाग पूर्ण होणार म्हणजे मोठं सेलिब्रेशन तर होणारच आणि म्हणूनच प्रेक्षक २० ते २४ ऑगस्ट पर्यंत 'चला हवा येऊ द्या' हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. यावेळी चला हवा येऊ द्या कलाकारांनी अनेक राजकारण्यांच्या भूमिका केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलेश साबळे जेव्हा अजितदादा पवार यांची भूमिका करतो तेव्हा काय होतं पाहा...



४०० भागांच्या या धमाल मस्तीमध्ये रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले. चित्रपटसृष्टीतील ३ नावाजलेले जाधव म्हणजेच दिग्दर्शक संजय जाधव, रवी जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव हे त्यांच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने सर्वांना थिरकायला लावणार आहेत.