मुंबई : आपल्या दिग्दर्शनासोबतच अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांना आनंद देणारा निपुण धर्माधिकारी नुकताच 'बाबा' (Nipun Dharmadhikari become father of baby Girl) झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोड बातमी निपुणने शेअर केली आहे. लग्नाला पाच वर्ष झाली असून निपुणच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निपुण धर्माधिकारीने गायिका संचिता चांदोरकरसोबत लग्न केलं आहे. संचिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. निपुणने इंस्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याने आई-लेकीचा आणि बाप-लेकीचा फोटो शेअर केला आहे. 



निपुण धर्माधिकारी 'भारतीय डिजिटल पार्टी'तील एक भाग्य आहे. तसेच निपुणने आपल्या लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयातून साऱ्यांनाच सुरेख कलाकृती दिली आहे. निपुणने अमर फोटो स्टुडिओ या लोकप्रिय नाटकाचं दिग्दर्शन निपुणने केलं आहे. तसंच संगीत मानापमान, संगीत सौभद्र या संगीत नाटकांच दिग्दर्शन देखील निपुणने केलं आहे. 


एमएक्स प्लेअरवरील Once a Year नावाच्या वेब सीरिजमध्ये निपुणचा उत्तम अभिनय प्रेक्षकांनी अनुभवला आहे. तसेच Mismatched या सीरिजचं दिग्दर्शन निपुणने केलं आहे.