मुंबई : गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 
ही मालिका राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं खास वैशिष्ट्य आहे. डॉ. हंसराज हाथी हेदेखील असेच एक खास पात्र आहे. मात्र ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा वर्षांपासून प्रेक्षकांना हसवणार्‍या डॉ. हाथी या पात्राचं पुढे काय? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. भविष्यात कवी कुमार आझाद यांच्याऐवजी कोणता कलाकार झळकणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. 



निर्मल सोनींचे नाव पुढे 


डॉ. हंसराज हाथी ही भूमिका कवि कुमार आझाद यांच्यापूर्वी निर्मल सोनी साकारत होते. त्यामुळे पुन्हा हा कलाकार डॉ. हाथींची भूमिका साकारू शकतो.  
निर्मल सोनी हा कलाकार तारक मेहता सोबतच पोलिस फॅक्ट्री, कबूल है अशा मालिकांमध्ये झळकला आहे. सोबतच शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला, तेरा मेरा साथ रहे, एक्शन जॅक्सन आणि दिल बेचार प्यार का मारा अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.