मुंबई : चित्रपटसृष्टी जशी झगमगती आहे तशीच त्याची दुसरी बाजू काळी आहे. सिनेविश्वात अशा कलाकारांची अनेक उदाहरणे आहेत ज्यांना सुरुवातीला खूप यश मिळालं पण नंतर ते चित्रपट सृष्टीतच्या काळ्या बाजूत गेले. याच कारणामुळे अनेक कलाकारांचं आयुष्य गरिबीत गेलं. यातील काही कलाकारांचा पैशांमुळे झालेला मृत्यू एवढा वेदनादायी होता की, ते पाहून लोकांच्या मनाचा थरकाप उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत 80 च्या दशकात करिअरच्या उंचीवर होती, मात्र हळूहळू तिच्या आर्थिक विवंचनेने तिला अशा प्रकारे पकडलं की ती चुकीच्या मार्गावर गेली आणि नंतर तिच तिच्या वेदनादायक मृत्यूचं कारण बनली.


आम्ही बोलत आहोत 80 च्या दशकातील अभिनेत्री निशा नूर यांच्याबद्दल. निशाने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवलं होतं. असं म्हटलं जातं की, त्यावेळी दक्षिण भारतातील प्रत्येक दिग्दर्शकाला निशासोबत चित्रपट बनवायचा होता. अभिनेत्रीने तमिळ आणि मल्याळम भाषेत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते, पण एक वेळ अशी आली की तिला चित्रपट मिळणंही बंद झालं.


सुरुवातीच्या मिळालेल्या यशानंतर हळूहळू तिची क्रेझ कमी होऊ लागली आणि नंतर ती बेरोजगार झाली. यानंतर आर्थिक विवंचनेमुळे तिला बळजबरीने वेश्याव्यवसायात यावं लागलं. आणि इथूनच तिच्या आयुष्याचा वाईट टप्पा सुरू झाला.



यानंतर, 2007 मध्ये, निशा दर्ग्याच्या बाहेर अत्यंत वाईट अवस्थेत सापडली ज्याची ओळख पटवणं कठीण होतं. तिचं शरीर पूर्णपणे अशक्त झालं होतं. तिच्या अंगावर किडे रेंगाळत होते. अशा स्थितीत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे तपासात तिला एड्स झाल्याचं समोर आलं. 23 एप्रिल 2007 रोजी निशा या आजाराशी लढत हरली आणि तिने या जगाचा निरोप घेतला.