कामाच्या अतिताणामुळे बॉलिवूडच्या साउंड एडिटरचं निधन
अवघ्या वयाच्या २९व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या 'हाउसफुस ४' चित्रपटाच्या सांउड टेक्नीशियन निमिष पलिंकरचं निधन झाले. अवघ्या वयाच्या २९व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीमुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर कलाकारांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
'स्लमडॉग मिलियनेयर'साठी ऑस्कर मिळवलेल्या रेसुल पोकुट्टी यांनी चित्रपट विश्लेषक खालिद मोहम्मद यांच्या ट्विटला रिट्विट केल्यानंतर या बातमीचा खुलासा झाला. खालिदयांनी निमिषच्या निधनावर प्रश्न उपस्थित केला. 'टेक्नीशियन बॉलिवूडच्या पाठीचा कणा आहे, पण कोणाला त्यांची चिंता आहे का?'
त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत रेसुल पोकुट्टींनी ट्विट केले, 'खालिद या मुद्द्यावर बोट ठेवण्यासाठी तुमचे आभार आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. बॉलिवूडच्या माध्यमातून वास्तव पाहण्यासाठी आपल्याला किती बलिदान द्यावे लागतील.' असं ट्विट त्यांनी केलं.
निमिष याने 'हाउसफुल ४' शिवाय 'बायपास रोड' आणि 'मरजावां' यांसारख्या चित्रपटांसाठी देखील टेक्नीशियनचे काम केले होते. अक्षय कुमारने देखील ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
कामाच्या अतितनावामुळे त्याच्या शरीरात रक्त दाबाचे प्रमाण अधिक वाढले. त्यामुळे त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले. तो एका वेब सीरिजसाठी दिवसरात्र काम करत होता.