मुलगी ईशा अंबानीच्या साखरपुड्यात नीता अंबानींचा डान्स जलवा...
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा ईशा अंबानीचा सोमवारी आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा झाला.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा ईशा अंबानीचा सोमवारी आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा झाला. अंबानी हाऊसमध्ये साखरपूड्याचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अनेक उद्योगपतींसह आमिर खान, रणबीर कपूर, करण जोहर आणि शाहरुख खान यांसारखे बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. शाहरुख खान आणि अंबानी परिवाराचे जवळचे संबंध आहेत. आकाश अंबानीच्या साखरपुड्यातही तो आर्वजून उपस्थित होता.
साखरपुड्याच्या एक दिवस आधी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल संपूर्ण कुटुंबियांसहीत इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
ईशाच्या साखरपुड्यात सर्वात लक्षवेधी ठरला तो म्हणजे आई निता अंबानीचा डान्स. नीता अंबानी नवलाई माझी लाडाची लाडाची ग या गाण्यावर थिरकल्या. निता अंबानींचा डान्स पाहुन मुकेश अंबानी उभे राहुन टाळ्या वाजवू लागले.
त्यानंतर ईशा आणि आई निता अंबानी यांनी एकत्र नच दे ने सारे गल मिल के या गाण्यावर डान्स केला. या शानदार सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आपल्या दोन्ही मुलांचा म्हणजे आकाश आणि ईशाचा विवाह एकत्र डिसेंबरमध्ये करणार आहेत. सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात उपस्थित राहिल्यानंतर करण जोहर अंबानींच्या पार्टीत सहभागी झाला. त्याने ईशा आकाशसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.