मुंबई : उद्योग जगतातील मोठं नाव मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. अंबानी कुटुंब केवळ श्रींमतीमुळेच नाही, तर त्यांच्या शाही आवडी निवडींमुळे ही चर्चेत आहे. नीता अंबानी यांच्या महागड्या कपडयांपासून वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीता अंबानी या आलिशान बंगल्यात राहत असून त्यांचे शौक देखील तितकेच मोठे आहेत. आज नीता अंबानी यांच्याकडे कोणत्याच गोष्टींची कमतरता नाही. प्रत्येक गोष्टींसाठी त्या मोठी रक्कम मोजतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टींची किंमत ही सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी नसते. 


नीता अंबानी या बऱ्याचदा पारंपारिक अंदाजात दिसतात. साडी आणि ड्रेस परिधान करणं त्या सर्वात जास्त पसंत करतात. पण त्यांच्या सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी मोठी रक्कम घेते. 


भारतीय संस्कृतीत साडीला अनन्य साधारण महत्त्व आहे. नीता अंबानी यांना महिलेला साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये देतात, असं बोललं जात आहे. या महिलेचं नाव डॉली जैन असं आहे. ज्यांचा जन्म कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये झाला आहे. या महिलेने आतापर्यंत अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्संना साडी नेसवली आहे.



मोठ्या फंक्शनसाठी अनेक सेलिब्रिटी डॉली यांना साडी नेसवण्यासाठी बोलावतात. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये डॉली जैन यांचं नाव आलं आहे. त्या फक्त 19 सेकंदात उत्तम साडी नेसवू शकतात.असा रेकॉर्ड त्यांनी केला आहे.