Niti Taylor  : 'कैसी ये यारियां' आणि 'बड़े अच्छे लगते हैं सीजन 2' फेम अभिनेत्री नीति टेलरनं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नीतिचे लाखो चाहते आहेत. पण हे चाहते फक्त तिच्या अभिनयाचे नाही तर तिच्या गोड हसण्याचे आणि डान्सचे देखील आहेत. नीति ही नेहमीच मोकळेपणानं बोलताना दिसते. सोशल मीडियावर नीति तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीतिनं खुलासा केला की लहाणपणी तिच्या हृदयात एक छिद्र होतं. त्यातून नीति कशी वाचली हे तिनं सांगितलं आहे. इतकंच काय तर जन्माला आल्यानंतर काही मिनिटांसाठी तिचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अचानक ती जिवंत झाली असा खुलासा तिनं केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतिनं नुकतीच ‘ईटाईम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नीतिनं तिच्या लहाणपणीच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.  ती मरणाच्या दारातून कशी परत आली याविषयी नीतिनं थोडक्यात सांगितलं आहे. 'लहान असताना मी मरणार होते. मी काही मिनिटांसाठी मेले होते आणि परत जिवंत झाले. तेव्हापासून मी आयुष्यात काहीतरी करू शकावं, यासाठी संघर्ष केला. ‘कैसी ये यारियां’ मालिका इतकी हिट होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण लोक आजपर्यंत आमच्या जोडीची आठवण काढतात. पार्थ आणि माझ्यावर खूप प्रेम करतात,' असं नीति म्हणाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Dipika Kakar च्या घरी येणार नवा पाहुणा; मात्र ईदच्या दिवशी 'ती'ला झाला अचानक रक्तस्राव आणि....!


पुढे नीतिनं आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात महिनाभरापूर्वी आलेला एक अनुभव सांगत नीति म्हणाली, 'एक महिन्यापूर्वी मी एक चित्रपट पाहायला गेले होते आणि एक मुलगी माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली नंदिनी प्लीज थांब, त्यानंतर तिने मला जे सांगितलं ते ऐकून मला आश्चर्य झालं. आम्ही कलाकार कोणाच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतो हे त्या दिवशी मला समजलं. कोरोनाकाळात त्या मुलीने तिचे वडील गमावले आणि तिला तिच्या कुटुंबात अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्या मुलीने सांगितले की तिने आत्महत्येचा निर्णय घेतला पण नंतर ती माझे व्लॉग बघू लागली आणि तिथूनच तिला जगण्याची आशा मिळाली. तिला माझा शो आवडतो, तिने मला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं. तिथे माझं संपूर्ण  आयुष्य तिनं पाहिलं. खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशीच मी सोशल मीडियावर आहे. आनंदी असेल तर आनंदी आणि दुःख असेल तर त्या भावना मी शेअर करते.'