मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे. तर आता 'अग्गंबाई सासूबाई' फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागलं होतं. अखेर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत.


दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता लॉकडाऊन अंतर्गत सरकारने शुटिंगसाठी बंदी घातली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून सेटवर योग्य ती खबरदारी बाळगून  मालिका, चित्रपटांची शुटिंग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. 


आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६,४६,०११ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये सध्याच्या घडीला ९,६८,३७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ४५,८७,६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.