मुंबई : अमिताभ बच्चन येत्या 11 ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवसानिमित्त भव्य सेलिब्रेशन होणार असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. मात्र खुद्द बीग बींनी अशी वृत्त निराधार असल्याचे ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. 




अनेक मोठी वर्तमानपत्र, इंटरनेटवर अमिताभ बच्चन यांच्या 75 व्या वाढदिवसाबाबत काय प्लॅन असू शकतात याबाबतचे तर्क - वितर्क वाचायला मिळत आहेत. पण "मी कोणत्याही पार्टीमध्ये, सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार नाही तसेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन होणार हे  वृत्तही निराधार आहे असे अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून सांगितले आहे.  


वाढदिवसानिमित्त घरातील किंवा अगदी बाहेरील कोणीही स्पेशल सेलिब्रेशनचे प्लॅन करत असले तरिही तेथे मी बीग बी जाणार नाहीत. साध्या पद्धतीने दिवसाची सुरवात करून, देव आणि थोर्‍या मोठ्यांचा आशिर्वाद घेऊन घरातील लोकांसोबतच राहणं अमिताभ जींना पसंत आहे.  


पाऊणशे वयोमान असणार्‍या अमिताभ बच्चन यांचा कामाचा उरक आणि उत्साह तरूणांनाही थकवणारा आहे. सद्ध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या 9व्या सीझनची रिहर्सल करण्यासोबतच, 'ठ्ग्स ऑफ हिंदूस्तान', '102 नॉट आऊट' या चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यग्र आहेत.