मुंबई :  बाबू मोशाय या फिल्ममधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीक पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र या सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज होताच, अनेकांच्या भुवया उंचावल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या सिनेमात अनेक बोल्ड सीन चित्रीत करण्यात आलेत. त्यामुळेच कदाचीत सेन्सॉर बोर्डाने तब्बल 48 कट या सिनेमाला सुचवल्याचं सांगण्यात येतंय. स्वतः नवाजुद्दीनला मात्र या सिनेमाची कथा खूपच आवडलीये. 
 
 


या सिनेमातली भूमिका मी याआधी केलेल्या काही सिनेमांसारखीच आहे की काय असं कदाचीत प्रेक्षकांना आधी वाटू शकत. 
 
 ग्रे शेडच्या भूमिकाच मी याआधी अधिक केल्यात. मात्र बाबू मोशाय हा सिनेमा आपल्यातल्या अभिनेत्याला आणखी एका वेगळ्या रुपात अनुभवण्याचा केलेला प्रयत्न असल्याचं नवाजुद्दीनचं म्हणणं आहे.