प्लीज, असं नको ना करू! ; युजर्सकडून मंदना करीमीला सल्ला
अभिनेत्री मंदना करीमी ही तिने तिच्या पतीवर केलेल्या आरोपामुळे नुकतीच चर्चेत आली होती.
मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मंदना करीमीचा एक व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका पार्टीतला आहे. या व्हिडिओला नेटीझन्सनी जोरदार ट्रोलही केले आहे. या व्हिडिओमध्ये मंदना हातात सिगरेट घेऊन डान्स करताना दिसते. हा व्हिडिओ पाहताच मंदना करीमी नेटीझन्सच्या चांगलीच निशाण्यावर आली. अनेक युजर्सनी तिला 'प्लीज, असे करू नकोस' सल्लाही दिला.
करीमीच्या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रीया
हा व्हडिओ पाहिल्यावर गौरव दालमिया नावाच्या एका व्यक्तिने लिहिले आहे की, 'शक्य झाल्यास प्रयत्न कर, सिगारेटसोबत फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नको. यातून योग्य संदेश जात नाही.' दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, 'तू माझी फेवरेट आहेस. पण, आता असे वाटते की तू सध्या डिप्रेस्ड आहेस.' सारा सिंह नावाच्या युजरने म्हटले आहे की, 'तुझ्या हातात व्हिडिओ आहे. पण, तुला माहिती आहे का हा व्हिडिओ लाखो तरूण-तरूणी पाहत आहेत.' तर, दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, धुम्रपाणास उत्तेजन देऊ नको. दरम्यान, काही युजर्सनी मंदनाला पाठिंबाही दिला आहे. काही युजर्सच्या म्हणण्यानुसार मंदना ही आता प्रोढ आहे आणि तिने सिगारेट प्यावं किंवा न प्यावं हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे.
पतीवर केलेल्या आरोपामुळे चर्चेत
दरम्यान, अभिनेत्री मंदना करीमी ही तिने तिच्या पतीवर केलेल्या आरोपामुळे नुकतीच चर्चेत आली होती. मंदनाने पती गौरव गुप्ता यांच्याविरूद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल केली होती. पण, काही काळाने तिने पुन्हा ही तक्रार मागेही घेतली होती. मंदनाने बिग बॉसच्या नवव्या पर्वामध्ये बरेच नाव कमावले. तिने 'भाग जॉनी', 'मैं और चार्ल्स', 'क्या कूल हैं हम-३' यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.