मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या चांगलीच तर्चेत आहे. दीपिका तिचा आगामी 'छपाक' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शुटींग वेळेसचे वेगवेगळे किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका एका सामान्य मुली प्रमाणे रस्त्यावर उभी राहिलेली दिसत आहे. दीपिका विक्रांत मॅसी सोबत दुचाकीवर फिरत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये 'छपाक' गर्ल आणि विक्रांत एकत्र दुचाकीवर स्वार आहेत. 'छपाक' लूकमध्ये असलेल्या दीपिकाला तेथील स्थानीकांनी देखील ओळखले नाही. तिच्यावर साकारण्यात आलेल्या मेकचे कौतुक केले जात आहे. तिचा हा लूक इंटरनेटवर भलताच व्हायरल होत आहे. 'छपाक' चित्रपटात दीपिका एक अव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होत आहे. १० जानेवरी २०२०ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे अभिनेता अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सुध्दा १० जानेवरी २०२० ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.