मुंबई : बॉलिवूडची 'दिलबर' गर्ल अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अदा आणि डान्सच्या जोरावर कलाविश्वात एक वेगळं स्थान निर्मण केलं आहे. चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या नोराच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. नोरा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता देखील नोराने काही फोटो पोस्ट केले आहेत. जाळीदार ड्रेसमध्ये नोरा फार हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेस फ्रिक अभिनेत्री नोरा सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते. आता  देखील सोशल मीडियावर नोराच्या क्रॉप टॉपने इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  यावेळी नोराने तिच्या भन्नाट डान्सने नाही तर अशा  जाळीदार ड्रेसमुळे चात्यांना घायाळ केलं. 


नोरा फतेहीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिलबर' आणि 'गर्मी' गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मन जिंकलं आहे. नुकताचं तिचा 'भुजः द प्राईड ऑफ इंडीया' प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नोराच्या अभिनयाने आणि डान्सने सर्वांच्या मनात राज्य केलं. चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री सोनाक्षीने देखील मुख्य भूमिका बजावली आहे.