मुंबई : आपल्या डान्सने बॉलिवूडला हादरवून सोडणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्समुळे तसंच तिच्या लूक आणि मजेदार व्हिडीओमुळे हेडलाईन्समध्ये असते. तिचं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर कव्हर झालं होतं. त्याचबरोबर अलीकडेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नोरा फतेही ऑटो ड्राईव्हरला इंग्लंडला सोडण्याबद्दल बोलत आहे. नोराच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाय गरमी या गाण्याने धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्री नोरा फतेहीने अतिशय कमी वेळात लोकांची मने जिंकली आहेत. चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. नोराच्या लोकप्रियतेचा अंदाज तिच्या नवीन आणि जुन्या व्हिडिओंमध्ये वाढत्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडेच, तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 


व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, नोरा फतेही, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला उभी आहे, ऑटो ड्रायव्हरला सांगते की, 'भाऊ, मुंबईत खूप गरमी आहे, थोडं इंग्लंडला सोड, 'व्हिडिओवर कमेंट करत, एका युजरने लिहिलं की, 'ही गरमी तुमच्या गाण्यापासून झाली आहे.' दुसर्‍या युजरने लिहिलं की, 'खूप गोंडस.'



नोरा एक लोकप्रिय चेहरा बनली आहे
'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटातील नोरा फतेहीची गाणी आजकाल चर्चेत आहेत. नोरा हिने 'दिलबर' आणि 'गर्मी' या गाण्यांतून आपली खास ओळख निर्माण केली आहे. यानंतर तिचं 'नच मेरी रानी' हे गाणं रिलीज झालं. ज्यात ती गुरु रंधावासोबत दिसली होती. या गाण्याने लोकांना नाचायला भाग पाडलं होतं. याशिवाय तिचं 'छोड देंगे' हा म्युझिक व्हिडिओही रिलीज झाला. आतापर्यंत या गाण्याला 360 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.