नोरा फतेहीची प्रकृती बिघडली,अभिनेत्रीला स्ट्रेचरवरुन नेण्याची वेळ
नोरा फतेही तिच्या बोल्ड फोटो आणि किलर डान्स स्टेप्समुळे चर्चेत असते.
मुंबई : नोरा फतेही तिच्या बोल्ड फोटो आणि किलर डान्स स्टेप्समुळे चर्चेत असते. डान्सिंग क्वीन नोरा फतेही यावेळी गायक गुरू रंधावाच्या साथीने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोरा तिच्या गाण्यात 'जलपरी'च्या अवतारात दिसणार आहे.
'डान्स मेरी रानी' हे दोन्ही नवे म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार आहेत. मात्र, या शूट दरम्यान अभिनेत्रीची अवस्था इतकी खराब झाली आहे की, तिला सेटवरून आणण्यासाठी स्ट्रेचरची मदत घ्यावी लागली. नोराला स्ट्रेचरवर पडलेलं पाहून चाहतेही काळजीत पडले आणि विचारू लागले की सगळं काही ठीक आहे ना?
नोराची चिंता लोकांना सतावत आहे
पंजाबी गायक गुरु रंधावासोबत नोरा फतेही दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. 'डान्स मेरी रानी' हे दोन्ही नवीन म्युझिक अल्बम 21 डिसेंबरला रिलीज होणार आहेत. पण हे गाणं रिलीज होण्याआधीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यानंतर लोकांना नोराच्या तब्येतीची चिंता वाटू लागली आहे.
स्ट्रेचरवरुन नोराला हलवण्यात आलं
खरंतर, व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्ट्रेचरवर पडलेली दिसत आहे. म्युझिक अल्बमसाठी नोराने 'जलपरी'चा अवतार घेतला असून अभिनेत्रीला घट्ट कपड्यांमध्ये फिरणं कठीण होत आहे. याच कारणामुळे नोराला स्ट्रेचरवर झोपवून हलवलं जात आहे. मात्र नोराची अशी अवस्था पाहून तिचे चाहते मात्र चिंतेत असल्याचं दिसत आहे.
3 महिन्यांत ड्रेस तयार
नोरा फतेहीच्या या ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर हा काही सामान्य ड्रेस नाही. नोराचा हा ड्रेस परदेशात तयार करण्यात आला आहे. ज्याचे वजन 15 किलो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याला बनवण्यासाठी सुमारे 3 महिने लागले आहेत. जे परिधान करुन मुव्ह करणं खूप कठीण काम आहे.