मुंबई :  जॅकलीन फर्नांडिस ठग सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडली आहे. याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचं  नाव देखील सुकेशसोबत जोडलं गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुकेशकडून महागड्या भेटवस्तू आणि लक्झरी वस्तू घेतल्याचाही आरोप नोरावर करण्यात आला आहे. मात्र आता धक्कादायक माहिती समोर येतेय ती म्हणजे, नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यामधील चॅट सध्या व्हायरल होत आहे. या चॅटमध्ये सुकेश नोराला महागडे गिफ्ट देण्याविषयी बोलत आहे. त्याचवेळी नोरा फतेही सुकेशचे गिफ्ट स्वीकारणार असल्याचं म्हणत आहे. नोरा-सुकेश यांच्यातील चॅट इंडिया टुडेने ऍक्सेस केल्या आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार, सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला भेटवस्तू आणि लक्झरी भेटवस्तूही दिल्या आहेत.


लीक झालेल्या चॅटमध्ये चंद्रशेखरने नोराला विचारलं होतं की, ''तुला रेंज रोव्हर कार आवडते का? यावर नोराने उत्तर दिले, 'होय, ही चांगली रफ यूज कार आहे. ही कार खूप गोंडस आहे, ही स्टेटमेंट कार आहे." यावर सुकेश म्हणतो, "मी तुम्हाला आणखी पर्याय देईन." तर दुसर्‍या चॅटमध्ये सुकेश चंद्रशेखर लिहिलं आहे की, ''तुम्ही एक मिनिट बोलू शकलात तर मला आनंद होईल आणि त्याबद्दल मी तुमचं आभारी राहीन''


''मला आशा आहे की, ही भेटवस्तू मी तुम्हाला का दिली गेली याचा विचार तुम्ही किंवा तुमच्या एजन्सीला होत नसेल. मला हे स्पष्ट करायचं आहे की, हे कोणत्याही प्रकारच्या उद्देशाने दिलेलं नाही, परंतु जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्ही त्यांना गिफ्ट देता. मी हे फक्त या कारणासाठी करत आहे, बाकी काही नाही." याआधी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.


ईडीने नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांची अनेकदा चौकशी केली आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी सुकेशशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे. सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे.