नोरा फतेहीचे चार रिलेशनशिप; त्यातील एक एक्सबॉयफ्रेन्ड आहे 2 मुलांचा बाप
चार प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत नोराचं रिलेशन, एक दोन मुलांचा बाप, दुसऱ्याने तर...
मुंबई : 'दिलबर' गर्ल म्हणजेचं अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या फिटनेस आणि जबरदस्त डान्समुळे चर्चेत असते. पण आता नोरा तिच्या फिटनेस आणि डान्समुळे चर्चेत आली नाही, तर ती आता तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. नोराचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आले. पण तिचं कोणतचं नातं शेवटपर्यंत टिकलं नाही. नोरा तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार क्वचित बोलते. पण आता नोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीत अभिनेता अंगद बेदीने सांगितलं होतं की तो नोरा फतेहीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अंगदने नेहा धुपियासोबत लग्न केलं. आता अंगद आणि नेहाला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. अंगदसोबत असलेल्या नात्यामुळे नेहा तुफान चर्चेत आली होती.
त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात नोराचं नाव प्रिंस नरूलासोबत देखील जोडण्यात आलं. तेव्हा नोराने प्रिंसबद्दल असलेल्या भावना देखील व्यक्त केल्या. पण ती कधी प्रिंन्सला 'आय लव्ह यू' म्हणाली नाही. कारण तेव्हा ती नात्याबद्दल गंभीर नव्हती. शो संपल्यानंतर देखील दोघे एकमेकांना डेट करत होते. पण प्रिंसच्या मनात युविका चौधरीने घर केलं होतं.
त्यानंतर प्रिंस आणि युविकाचं नातं अधिक घट्ट होत गेलं. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर तीने बॉडी बिल्डर वरिंदर घुमनला देखील डेट केलं आहे. पण हे नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.
याशिवाय नोरा फतेही डान्स रिऍलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर' मध्ये पाहुणी म्हणून दिसली होती. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, ज्यात कोरिओग्राफर टेरेन्स लुईस अभिनेत्री नोरा फतेहीला प्रपोज करताना दिसला. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं.